मी नुकताच महापारेषण कंपनीतून निवृत्त झालो. ३३ वर्ष कंपनीची सेवा करतांना मी नातेवाईक, सगेसोयरे यांना वेळ देऊ शकलॊ नाही. कार्यालयाच्या व्यापामुळे सतत एका ठिकाणाहून बदली होत गेल्याने मी माझ्या नातेवाईकांपासून दूर होत गेलो. परिणामी नातेवाईकांच्या लग्नकार्यात उपस्थित राहू शकलॊ नाही व योगदानही देऊ शकलॊ नाही.
अशीच परिस्थिती नोकरी करणा-या कर्मचा-याची असते. त्यामुळे मुला-मुलींचे लग्न जुळवतांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. पुर्वीच्या काळी लोक १० ते ५० कि.मी च्या अंतरातच सोयरीक संबंध जुळवत होते. याला कारण कमी असणारी वाहतुकीची आणि संपर्काची साधने होते. आता परिस्थिती बदलली आहे. जग इंटरनेट आणि विमानासारख्या गतीमान वाहनांमुळे हाकेच्या अंतरावर येऊन ठेपले आहे. साहजिकच आजच्या विज्ञान युगात इंटरनेट हे लग्न जुळवण्याचे प्रभावी साधन झाले आहे.
या प्रगत तंत्रज्ञानाचा आपल्या मुलामुलींकरीता योग्य वधू-वर शोधण्यासाठी सर्व जाती-धर्मांकरीता उपयोग झाला पाहिजे. म्हणून या "शुभ मंगल विवाह प्रतिष्ठानाची" स्थापना करून माझ्या हातून सामाजिक कार्य घडावे ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. या कार्यास आपल्या सर्वांचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभावे हीच विनंती!